रत्नागिरी : School Close : कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरीत आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिलेत. दरम्यान, ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाविद्याय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद (School Close) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, भाईंदर, पुणे, नागपूर येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आता रत्नागिरी (Ratnagiri)  आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg)  जिल्ह्यात देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. 


कृषी विद्यापीठात विद्यार्थी कोरोना बाधित


रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा आजपासून बंद होत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंदचे आदेश दिले आहेत. पहिलीपासून ते बारावीपर्यतचे वर्ग बंद राहणार आहेत. दरम्यान, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात सात विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सतर्क झाले आहे. 


लसीकरणानंतर माध्यमिक शाळा बंद


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवार 6 जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.