कोल्हापूर : महानगरपालिकेत जात चोरणाऱ्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय. तब्बल  १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे न्यायालयानं हा निकाल दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आता कोल्हापूर पाठोपाठ राज्यातल्या अशाच जात चोरणाऱ्या तब्बल ९ हजार लोकप्रतिनिधींवर पद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महापालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू असणार. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा पोटनिवडणुका होतील.