जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, आणखी दोघे निलंबित
खेड दापोली मंडणगडमधील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आणखी दोघांना निलंबित करण्यात आलंय. झी 24 तासनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं तसंच सातत्यानं त्याचा पाठपुरावाही केला.
रत्नागिरी : खेड दापोली मंडणगडमधील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आणखी दोघांना निलंबित करण्यात आलंय. झी 24 तासनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं तसंच सातत्यानं त्याचा पाठपुरावाही केला.
याप्रकरणी आता कारवाईला सुरवात झालीय. खेड तालुका कृषी अधिकारी सुरेश कांबळे आणि मंडळ कृषी अधिकारी गुलाबसिंह वासावे यांना निलंबित करण्यात आलंय. राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या सचिवांनी हे निलंबनाचे आदेश दिलेत.
निलंबन कालावधीत मुख्यालय सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हाधिकारी समितीच्या शिफारसीनंतर ही कारवाई करण्यात आलीय. यापूर्वी याप्रकरणी कृषी सहाय्यक पांडुरंग दुबळे आणि कृषी पर्यवेक्षक प्रकाश गोरीवले यांना निलंबित करण्यात आलं होतं. याचाच अर्थ याप्रकरणी आतापर्यंत चौघांना निलंबित करण्यात आले आहेत.