अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे. त्यासाठी १८०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्‍या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम करण्‍यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पथकाला विशिष्ट रंगाचे टीशर्टस तसेच बॅचेस देण्यात येणार आहेत. केंद्र परिसरात ९० सीसीटीव्हीचे जाळे असून शिवाय टेहळणी मनोरे देखील उभारण्यात आले आहेत.