Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवार पेठेत राहणाऱ्या पती-पत्नीचा (Husband- Wife DeadBody) मृतदेह राहत्या घरात आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Husband- Wife DeadBody Found In Pune)


राहत्या घरात सापडला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहत्या घरात पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे तर पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. हेमंत रामकृष्ण थोरात (64) आणि सुनीता हेमंत थोरात (58) अशी मयत पती-पत्नींची नावे आहेत. शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळजवळ हे दोघे पती-पत्नींची राहत होते.


मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट


रविवारी सकाळी खडक पोलिसांना घटनेविषयी माहिती मिळाली तेव्हा ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करताच सुनिता हेमंत थोरात यांचा मृतदेह बेडवर आढळून आला तर हेमंत थोरात यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच दोघांचे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे, असं पोलिसांनी नमूद केलं आहे. 


तीन ते चार वर्षांपासून होत्या आजारी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनिता थोरात यांच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, परिसरातील शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता थोरात या तीन ते चार वर्षांपासून आजारी होत्या. तर, हेमंत थोरात यांनी आत्महत्या केली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस त्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणार आहेत.