पर्यावरण नियमांचं उल्लंघन, मिळाली अजब शिक्षा
पर्यावरणाचा ऱ्हास होतोय अशी आपण सर्रास बोंब ठोकतो. पण
पुणे : पर्यावरणाचा ऱ्हास होतोय अशी आपण सर्रास बोंब ठोकतो. पण
त्या पर्यावरणाची काळजी आपण घेताना दिसतो का? तर तस फारसं होताना आढळत नाही. आपल्याकडे विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना किंवा वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दिवसभर कोर्टात बसून राहण्यासारखी सौम्य शिक्षा कोर्ट सुनावतं. पण पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांना आपण काय शिक्षा देतो का? पण पुण्यात आता अशा दोन व्यक्तींना कोर्टाकडून अजब शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे हा नेमका प्रकार?
पुण्यात दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी साठ हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलंय. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं झालेली पुण्यातील ही पहिलीच शिक्षा आहे.या घटनेमुळे नक्कीच अशा व्यक्तींवर चोप बसेल. आणि पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हास करताना नागरिक विचार करतील?