यवतमाळ : यवतमाळची नरभक्षक वाघीण टी-१ अर्थात अवनी हिला पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी वनविभागानं आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर नागपूर खंडपीठानं सविस्तर आढावा अहवाल मागवलाय. शूटर शाफत अली खान याच्या भूमीकेवरही न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलेत. 'अर्थ ब्रिगेड' या संस्थेनं टी-वन प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्या याचिकेवर सुनावणी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सुनावणीत टी-वन वाघिणीसंदर्भात अहवाल मागवलाय... तसंच याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवण्यात आलीय.


सोशल मीडियावर मोहीम


नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला वाचवण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला असून या मोहिमेला केवळ भारतच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. नरभक्षक असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या जंगलातील 'अवनी' (टी -१) वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वनखात्याला दिले आहेत. त्यानुसार वन विभागाने हैदराबाद चा शुटर नवाब शाफात आली खान यालाही बोलावण्यात आलंय.