मुंबई / लातूर : कोरोनाचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातच एक दिसाला देणारी बातमी आहे. कोरोनाचा अर्थात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यांनी येथे दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन कोरोना रुग्णांच्या सर्व तपासण्या आणि उपचार यापुढे नि:शुल्क करण्यात आले आहेत. कोविड -१९ ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.


कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही  मंत्री  देशमुख यांनी म्हटले आहे.