सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : एका निर्दयी बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीला 3 वेळा विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिसांनी याप्रकरणी 8 आरोपीना अटक केली आहे.


नेमकी घटना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमधल्या हदगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका नराधम बापाने आपल्या मुलीला आधी राजस्थान नंतर नंदुरबार आणि त्यानंतर सातारा इथं लग्नाच्या नावाखाली वयस्कर व्यक्तींना विकलं. पहिल्या पत्नीला सोडून हा व्यक्ती दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. मुलीला त्यानं स्वत:कडे ठेवलं होतं. 


2018 मध्ये त्याने भावना चावला ह्या महिला एजंट करवी मुलीला राजकोट मधील एका व्यक्तीकडे विकलं. मुलीचा तिथं शारीरिक छळ करण्यात आला त्यामुळे मुलीची तब्यत बिघडल्याने तिच्या वडीलाने तिला गावी आणलं.


पण 2 महिन्यातच मुलीला पुन्हा नंदुरबार इथल्या संदीप माळी या व्यक्तीला 2 लाख रुपयांना विकलं. पीडित मुलगी 8 महिने नंदुरबारमध्ये होती. माळी याने पैसे न दिल्याने पित्याने मुलीला पुन्हा गावी आणलं.


पैशाला सोकावलेल्या बापाने मुलीची तिसऱ्यांदा विक्री केली. सातारा इथल्या विठ्ठल गायकवाड या व्यक्तीबरोबर मुलीचा 2 लाख रुपयांना सौदा केला. पीडित मुलीने कसाबसा फोन कर आपल्या मावशीला सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीची मावशी आणि नातेवाईकांनी सातारा इथून तिची सुटका केली. 


या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या वाडीलांसह काही दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 8 आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.