कोल्हापूर : कोल्हापुरातून एका युवकाने आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येच कारण त्या कुटूंबासाठी धक्कादाय आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या फोनचा पासवर्ड एका चिट्ठी वरती लिहून ठेवला होता, त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता. या घटनेचा आणि या पासर्वर्डचा संबंध काय? असा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु कोणतेही पुरावे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर ही घटना कोल्हापूरच्या इचलकरंजी भागातील आहे. पोलिसांनी जेव्हा या घटनेमध्ये शोध घेतला असता. हा तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे.


हा तरुण मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. ज्यामुळे त्याने सोमवारी (ता.15) दुपारी आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांच्या लक्षात आले की, त्याचे त्याच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलणं कमी झालं होतं. तसेच त्याच्या वागण्यातही फरक पडला होता.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये या मृत तरुणाने आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे.


संबंधित युवकाने हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीनं आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस सध्या करत आहेत.