पुणे : पुणे हे एक असं ठिकाण आहे, जिथे खूप लांबून लोकं फिरायला येतात. तेथील दृश्य, तेथील इतिहास सगळ्यांनाच या गोष्टी पाहण्याची एक ओढ लागलेली असते. त्यात शनिवारवाडा, बुधवार पेठे ही पुण्यातील नावाजलेली ठिकाणं. परंतु पुण्याच्या या नावाजलेल्या भागातून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर पर्यटक तेथे जाताना 10 वेळा विचार करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहर फिरायला आलेल्या एका पर्यटकासोबत बुधवार पेठेत एक विचित्र प्रकार घडला. पुणे फिरायला आलेला हा व्यक्ती बुधवार पेठेतील दाणी आळीतून जात होता, त्यादरम्यान एक व्यक्ती या पर्यटकाकडे आला आणि त्याने याला जबरदस्ती मिठी मारली. मिठी मारल्यानंतर त्याने या पर्यटकाकडून 26 हजार रुपये चोरुन घेतले.


आपले पैसे चोरीला गेलेत असं समजताच या पर्यटकाने जवळील फरासखान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांना चार जणांविरुद्ध FIR दाखल केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पर्यटक मुळचा बीड जिल्ह्यातील धानोरा गावातील रहिवाशी आहे. ते शनिवारी म्हणजेच 23 ऑक्टोबरला पुणे फिरायला आले होते. तेव्हा दुपारी साडेतीनच्या सुमारात ते जेव्हा बुधवार पेठेकील दाणी आळीतून पायी चालत जात होते, तेव्हा त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.


दाणी आळीतील नवीन बिल्डींगसमोर आल्यानंतर आरोपी या पर्यटका जवळ आले आणि त्यांनी विचारले की, तुम्ही गावाकडून आलात का? आणि पर्यटकाचा हात पकडला आणि त्याला जबरदस्तीने मिठी मारली. त्यानंतर या पर्यटकाचे पाकिट चोरुन नेले, ज्यामध्ये सुमारे 26 हजार रुपये होते.


आता या प्रकरणात फरासखान पोलिस सखोल चौकशी करत आहेत.