Pune Crime News : वाढदिवसाला दुबईला का नेलं नाही? वाढदिवसाला मनासारखे गिफ्ट का दिलं नाही म्हणून पती-पत्नीत भांडण (husband wife Clash) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक पतीचा मृत्यू झाला (Wife Finish her husband) आहे. पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली. पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे. निखील पुष्पराज खन्ना (वय-36) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतलं आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरगुती भांडणातून झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना कळवलं.


आणखी वाचा - कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून RTO कार्यालयात घुसून एजंटंचा कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला


मयत निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल,पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता.पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.


दरम्यान, झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल समोर आली होती. पुण्यातल्या हडपसर येथील उरुळी देवाची परिसरात घटना घडली. घरासमोर हॉर्न वाजवून झोपमोड केल्याने पाण्याच्या टाकीत बुडवून मालकाची हत्या केल्याने पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.