fake electricity cut message : आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन (SmartPhone) आलेत, इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. मोबाईल फोन (Mobile) हा आपल्या दैनंदिन कामाचा एक भागच बनलाय. घरातलं किराणा सामान मागवण्यापासून वीज बिल, गॅस बिल भरण्यापर्यंत सर्व कामं आपण मोबाईलद्वारे ऑनलाईन भरत असतो. पण ऑनलाईनचा वापर जितका वाढलाय, तितकाच ऑनलाईन फसवूणकीच्या (Online Fraud) घटनांमध्येही मोठ्याप्रमाणवार वाढ झाली आहे. नागपूरमध्ये एक असाच ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. आणि यावेळी सायबर गुन्हेगारांनी नवीन पद्धत शोधून काढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे मोडस ऑपरेंडी
नागपूरमधल्या एका व्यक्तीला वीज बिलाचा (Electricity Bill) खोटा मेसेज पाठवण्यात आला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या नावासकट हा मेसेज पाठवण्यात आला. त्यामुळे त्या व्यक्तीलाही हा मेसेज खरा असल्याचं वाटलं. राजेश कुमार अवधिया असं या व्यक्तीचं नाव असून तो एका सरकारी कंपनीत कामाला आहे. 29 ऑगस्टला त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यात तुमचं वीज बिल भरणा बाकी असल्याचं सांगण्यात आलं. तसंच वीज बिल न भरल्यास वीज कापली जाईल असा इशाराही देण्यात आला होता. 


वीज बिल भरण्यासाठी या मेसेजमध्ये एक लिंकही पाठवण्यात आली होती. ती लिंक उघडत वीज बिल भरण्याच्या सूचना त्या मेसेजमध्ये देण्यात आल्या होत्या. वीज खंडीत होण्याच्या भीतीने राजेश कुमार यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केलं. वीज बिल बरण्यासाठी त्याने आपली सर्व डिटेल्स त्या लिंकवर अपलोड केले. पण इथेच त्यांची फसवणूक झाली. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक अकाऊंटमधून 1लाख 68 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच राजेश कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या आधारे आता पोलीस तपास करत आहेत. 


सध्या वीज बिलासंदर्भातले असे खोटे मेसेज अनेकांना पाठवण्यात आले आहेत. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. तुमची फसवणूक होऊ शकते.


सायबर फसवणूकीचे अनेक गुन्हे
सायबर गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचीच फसवणूक करण्यात आली होती. चांगल्या ठिकाणी पोस्टींग देण्याचं आमिष दाखवत त्या बदल्यात बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं होतं. या आमिषाला भुलून त्या पोलीस कर्मचाऱ्यानेही पैसे ट्रान्सफर केले होते. नंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.