सांगली : जिल्ह्यातील ब्रम्हनाळमध्ये कृष्णा नदीत १४ वर्षीय सागर डंक या मुलावर  मगरीनं हल्ला करत त्याला नदी पत्रात ओढून नेले. वनविभाग आणि ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरु आहे. मगरीच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा कृष्णाकाठ हादरलाय. सुटीनिमित्ताने मामाच्या गावी आलेल्या या अल्पवयीन मुलावर जीव घेणा हल्ला झाल्याने परिसरात घबराट पसरलेय. दरम्यान, बेकायदा वाळू उपशामुळे मगरींचा उपद्रव वाढल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिलेय. त्यामुळे वाळूमाफियाही या प्रकरणाला तितकेच जबाबदार असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील हारुगिरीमध्ये सागर डंक हा त्याचे मामा सुनील नरुटे यांच्याकडे सुटीसाठी आला होता. नववीत शिकणारा सागर मामांसोबत कृष्णा नदीकाठी गेला होता. इतर मुलांसोबत नदीकाठी घाटावर तो बसला होता. त्यावेळी मगरीनं सागरवर हल्‍ला करून त्याला पात्रात ओढून नेलं. मगरीनं नदी पत्रात हल्ला करून ओढून नेलेला मुलगा सागर याचा वनविभाग आणि ग्रामस्थांकडून शोध सुरू आहे. 


मागील काही वर्षापासून कृष्णा काठच्या अनेक नदी काठच्या गावात मगरीनं हल्ले केलेत. वारंवार होणारे हल्ले बघता मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.