संचारबंदीचा फटका हार्ट रूग्णांना; जाणवतोय औषधांचा तुटवडा
या संचारबंदीमुळे शहरात आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
अमरावती : अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे संचारबंदी लावण्याचे आदेश दिले गेले. या संचारबंदीचा फटका काही गोष्टींना बसलेला दिसला. या संचारबंदीमुळे शहरात आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
संचारबंदीमुळे शहरात हार्ट अटॅकचं इंजेक्शन संपण्याच्या मार्गावर असून डेंगूसह अन्य अजारांवरील औषधांचीही टंचाई जाणवू लागलीये. 7 दिवसांच्या बंदमुळे विक्रेत्यांना 25 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. कुरिअर आणि वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे औषधांचा तुटवडा जाणवतोय.
यामुळे औषधं विक्रेते पुरते हैराण झाले आहेत. प्रशासनाने यावर लवकर मार्ग काढावा अशी मागणी औषध विक्रेत्यांकडून करण्यात येतेय.
अमरावतीत 13 तारखेला झालेल्या बंदमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या हिंसारामुळे काही दुकानांची तोडफोड केली असून बंदला हिंसक वळण लागलंय. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली होती.
अमरावती शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी आणि इतर महत्वाच्या कामासाठी 4 तासांची शिथिलता देण्यात आली होती.