मुंबई : अरबी समुद्रातील Tauktae चक्रीवाद  पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. चक्रीवादळाचे वाढते स्वरुप पाहून आता बर्‍याच राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्रासह किनारपट्टीवरील अनेक राज्यांना चक्रीवादळ Tauktae चा धोका आहे. हा चक्रीवादळ कर्नाटकात देखील दाखल झाला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला आणि 4 लोकांचा मृत्यूही झाला आहे. कर्नाटकानंतर आता त्याने गोव्याच्या किनारपट्टीवरही धडक दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळामुळे एनडीआरएफने Tauktae वादळाचा धोका असलेल्या सर्व राज्यांत आपले पथक तैनात केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एनडीआरएफने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपली 79 टीम तैनात केली आहेत. दरम्यान, या वादळासंदर्भात महाराष्ट्रातून एक मोठे अपडेट आले आहे.


चक्रीवादळ मुंबईला धडकेल की, नाही याची माहिती एनडीआरएफच्या डेप्युटी कमांडरने दिली. आयएमडीच्या अहवालानुसार चक्रीवादळ मुंबईवर आधळणार नाही. परंतु यामुळे नक्कीच समस्या निर्माण होतील. वादळामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वारे देखील वाहू शकतात, यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.


एनडीआरएफची टीम मुंबईत तैनात


एनडीआरएफचे डेप्यूटी कमांडंट म्हणाले की, "किनारपट्टीच्या भागात कोठेही समस्या आल्यास एनडीआरएफची टीम त्वरित तिकडे रवाना होईल. आमची एनडीआरएफची टीम आधीच सर्वत्र कार्यरत आहे, ज्यामध्ये 120 लोकं सामील आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली, कोणतेही झाडं कोसळले, कोणता रोड खराब झाला किंवा कोणतीही समस्या आली तरी आम्ही तयार आहोत."


एनडीआरएफचे पथक महाराष्ट्रातून गुजरातकडे रवाना


जोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न आहे एनडीआरएफची रत्नागिरी, सिंधुदुर्ग दक्षिण गोवा येथे आधीच टीम तैनात करण्यात आली आहे. टीम यापूर्वीच गोव्यात पोहोचली आहे आणि उर्वरित जागांकडे ते लवकरच पोहोचतील. त्यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे गुजरातच्या काही भागांना धोका आहे. त्यांमुळे एनडीआरएफ टीम आता  गुजरातला पाठविण्यात येत आहेत.ॉ


गृहमंत्र्यांकडून आढावा बैठक


केंद्र सरकार चक्रीवादळ Tauktae वर बारीक नजर ठेवून आहे. चक्रीवादळ टाळण्यासाठी होणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस गुजरात, महाराष्ट्र, दमन-द्वीवबेटांचे अधिकारी उपस्थित होते.


चक्रीवादळग्रस्त राज्यांमध्ये वीज बॅकअप राखण्याच्या सूचना त्यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांना दिल्या आहे. यासह चक्रीवादळग्रस्त राज्यांमध्ये कोविड रुग्णांना कोणतीही अडचण उद्भवू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.