Kharghar: खारघर मधील सिडकोच्या (cidco) स्वप्नपूर्ती  सोसायटी मद्ये सध्या चोरांचा सुळ सुळात झाला आहे. हे चोर रात्र झाल्यावर सोसायटी मद्ये शिरून चप्पल आणि सायकल (thief at night) चोरत आहे. हा प्रकार गेली 20 दिवसांपासून सुरू असून, चोर चोरी करताना सीसीटिव्ही (cctv) मध्ये  कैद झाला आहे. रात्री सोसायटीच्या संरक्षक भीती वरून रात्री (crime news) उडी मारून प्रवेश करत आहेत. इमारतमध्ये  शिरून ब्रँडेड कंपनीचे चप्पल आणि शूज चोरत आहेत तसेच सायकली, सिलेंडर गृहउपयोगी वस्तू देखील चोरून नेले आहेत. सोसायटीमध्ये हे दोन वेळा झाले असून नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. सुरक्षारक्षक असून देखील या चोरी होत आहे. चोरी करतानाचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. (cylinder, shoes and cycles are getting robbed in kharghar)


गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिलेंडर मधून गॅस काढून तो दुसऱ्या सिलेंडर मध्ये टाकून विक्री करणाऱ्या टोळीला परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या टीमने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.अनेक दिवसापासून सिलेंडर मधून गॅस चोरी करण्याच्या प्रकार सुरू असल्याचा संशय पोलिसांना होता,त्याच अनुषंगाने गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ह्या टोळीचा पर्दाफाश केला.यात एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून तीन गाड्यांसह दीडशे सिलेंडर (cylinder) आणि इतर साहित्य असा एकूण सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यात अजून कुणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. 


हेही वाचा - Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...


चोरीच्या गंभीर घटना थांबेना : 


महाराष्ट्र शासनाकडुन शालेय विदयार्थीना विनामुल्य पुरवण्यात येणारा पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक व अपहार करत थेट काळया बाजारात विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी सापळा रचत पकडले..ही घटना नाशिकच्या मालेगाव येथील ताश्कंद बाग दगडी हायस्कूल पाठीमागे घडली.. याप्रकरणी पोलिसांनी धान्य (transport) वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकसह 24 लाख 43 हजार 965 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत शेख उबेद शेख बाबू रा.मालेगाव व चालक प्रल्हाद दत्तू सावंत रा.धुळे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान तब्बल 25 लाख रुपयांचा विद्यार्थ्यांना विनामूल्य दिला जाणारा पोषण आहार काळया बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडल्याने पोषण आहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. 


गुजरात राज्यातील होमगार्ड निघाला चोर :


नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एका बिअर शॉपमध्ये चोरी करणारा होमगार्ड असल्याचं समोर आला आहे. पोलिसांनी या होमगार्डला ताब्यात घेतले आहे. नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा बिअर शॉपी मध्ये गल्ल्यातून हजारो रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या अनुषंगाने बिअर शाॅपचे संचालक यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दुकानातील सीसीटिव्हीच्या फुटेजच्या आधारे नवापूर पोलीसांनी चोराचा शोध घेतला. अवघ्या तीन तासात संशयित (viral news) आरोपीला नवापूर पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुजरात राज्यातील ससा या गावातील संशयित आरोपी ऐलिम ईश्वरभाई गामीत या संशयित आरोपी गुजरात राज्यातील उच्छल पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.