Cyrus Poonawalla Health Update : सायरल पुनावाला यांना शुक्रवारी सकाळी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष (Serum Institute of India) सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याची माहिती आहे. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस पुनावाला यांना शुक्रवारी सकाळी रूबी हॉल क्लिनिकमध्ये ( Ruby Hall Clinic) उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं समोर आलं आहे. रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. 


प्रेस नोटमध्ये म्हटलंय की, डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य इन्फार्क्ट झाला होता, त्यांना रुबी हॉल  येथे दाखल करण्यात आले होते. 17 नोव्हेंबरच्या पहाटे डॉ. सायरस पूनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी केली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पूनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.


कोण आहेत सायरस पुनावाला ?


सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या (Forbes) 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहे. 1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.