डी.एस.कुलकर्णींना कधीही अटकेची शक्यता
बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कधीही अटक होऊ शकते.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कधीही अटक होऊ शकते. आजपर्यंत डी.एस.कुलकर्णींना न्यायालयामध्ये ५० कोटी रुपये भरायचे होते. पण त्यांनी हे पैसे भरले नाहीत. त्यामुळे डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक व्हायची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं डीएसकेंना ५० कोटी रुपये भरायला सांगितले होते. तसंच वाढीव मुदत देण्यासही न्यायालयानं नकार दिला आहे. डीएसकेंनी ५० कोटी रुपये न भरल्यामुळे आता तपास अधिकारी कारवाई करण्यास मोकळे आहेत, असं न्यायालयानं म्हंटलं आहे. डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.