मालेगाव : जनतेनेच निवडूनदिलेल्या लोकनियुक्त सरपंचाला (Sarpanch) जनतेनेच ग्रामसभेत मतदानाने पायउतार केल्याची घटना मालेगावच्या दाभाडी (Dabhadi) गावात घडली आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरोधात ग्रामपंचायत सदस्य अविश्वास ठराव आणला. जनतेच्या भावनेचा अनादर करीत प्रकार वाढत असल्याने राज्य शासनाने त्यात बद्दल करीत जनतेच्या दरबारातच थेट सरपंचपदाचा फैसला करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात राजकिय दृष्टया जागृत असलेल्या दाभाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच चारूशिला अमोल निकम यांच्या विरोधात अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी विशेष ग्रामसभेत जनतेनेच एक हजार २७२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर केल्याने निकम यांना पायउतार व्हावे लागले आहे. विशेष ग्राम सभेतील अविश्वास ठराव मंजूर झाल्याची नासिक जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. 


ग्रामसभेसाठी आपण सकाळी मतदार नोंदणी केली.१६ हजार ४१६ मतदारनपैकी ५३९७ मतदारांनी नोंदणी केली.त्यापैकी ५०६५ मतदारांनी ११ते २ काळात मतदानाचा हक्क बजावला.वैद्य मतदान ४४५२ एवढे झाले. अवैध मतदान २३९ तर ठरावाच्या बाजूने ३०४९ तसेच विरोधात १७७७ मतदान झाले.अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर झाला आहे. 



२०१७ मध्ये ग्रामपालिकेच्या पंचवार्षिक आणि प्रथमच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत चारूशिला अमोल निकम विजयी झाल्या  होत्या. सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी तसेच गैरव्यवहार करीतअसल्याचा त्यांच्यावर आरोप होता. विभागीय आयुक्तांनी सरपंच निकम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १ ५८ चे कलम ३९ (१) नुसार सरपंच व सदस्य पदावर राहण्यासाठी अपात्र ठरविले होते. 


सरपंच निकम यांच्या विरोधात यापूर्वीच १४ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावही आणला होता. अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अविश्वास ठरावासाठी राबविण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत प्रारंभी सकाळी ७ ते १० या वेळेत मतदानासाठी नाव नोंदणी करण्यात आली. त्यात ५ हजार ३९७ मतदारांची नोंदणी झाली. त्यानंतर ११ ते २ या कालावधीत मतदान घेण्यात आले. यावेळी सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी उत्सफूर्त सहभाग घेत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ५ हजार ०६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 


सरपंच यांच्याविरुद्ध एक हजार २७२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले. निकालाची घोषणा होताच समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. तर हा जनतेचा विजय आहे. असून जी जनता पदावर बसवू शकते तीच जनता पायउतारही करू शकते हा संदेश यानिमित्ताने दाभाडीच्या ग्रामस्थानी दिला.


आम्ही सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणला होता.थेट सरपंचाविरोधात भष्ट्राचाराचे आरोप आहेत. विभागीय आयुक्त व ग्रामविकास मंत्र्यानीही त्यांना पायउतार केले होते. जनतेने आज त्यांना मतदानाच्या माध्यमातून पायउतार केले आहे. जनतेने धनशक्तीकडे न झुकता जनशक्तीला प्राधान्य दिले हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. यापुढे गावात जनतेचे राज्य राहील, असे ग्रामस्थ निळकंठ निकम यांनी सांगितले. 


अविश्वास ठराव आणण्याचे कारण गावात गिकास नाही. सामान्य जनता काम घेऊन गेल्यास त्यांना व्यवस्थित वागणूक दिली गेली नाही तेव्हापासून सरपंचाने त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले होते. सरपंचावर भष्ट्राचाराचे आरोप होते. त्यांच्या विरोधात लढा उभारला आणि अविश्वास ठरावाच्या वेळी ग्रामास्थानी उत्स्फूर्त मतदान केले. जनतेनेच त्यांना पायउतार केले, असे  उपसरपंच सुभाष नहिरे म्हणाले.


जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेनेचे काम करीत नसेल तर  जनता त्यांना  घरचा रस्ता  दाखवू  शकते,  हेच  या निमिताने  स्पष्ट झाले. मात्र जनतेने विकासासाठी लोकप्रतिनिधींवर असाच नैतिक दबाव ठेवल्यास लोकशाही मजबूत  झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.