प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला.  कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच दंहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र दुर्देवाने ज्याची भीती होती तेचं झालं. दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलंय. एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. (dahi handi 2022 1 govinda death due to heart attack during dance at pach pandhari village ratnagiri)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सर्व धक्कादायक प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पंढरी गावात घडलाय. वसंत लाया चौगले असं या मृत गोविंदाचं नाव आहे.


नक्की काय झालं?  


गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वसंत चौगुलेही दहीहंडीत सहभागी झाले होते. मात्र नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यामुळे गावातल्या दहीहंडी उत्सवावर शोककळा पसरली.