मुंबई :  मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होणार होते. पण यावर प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी धावून आली आहे. प्रवाशांची तारांबळ होऊ नये म्हणून मुंबई-पुणे मार्गावर दररोज १८० बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यासाठी २५ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. यावर आता पर्यायी सोयही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीला एसटी धावून आली आहे. रेल्वे मार्ग दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची  गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात असे निर्देश दिले आहेत.