मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. खणखणीत भाषणांनी दोन्ही गटातील नेत्यांनी वातावरण तयार केलं आहे. बीकेसीवरील शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँगेसच्या नेत्या सोनिया गांधींवर आसूड चालवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसऱ्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुह्रदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले? शरद पवार. मोठ्याने नाव घ्या घाबरू नका. बारामतीचा महमद्या कोणाला म्हणाले, शरद पवार. दाऊदचा हस्त आहे कोणाला म्हणाले, शरद पवार. ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुह्रदयसम्राट म्हणाले, असं म्हणत शहाजी पाटील यांनी टीका केली आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. 


माझ्या मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन हे बघून जा म्हणावं, मग खरी शिवसेना कुठली हे कळेल, असं म्हणत शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.