कर्जबाजारी शेतकऱ्याचा चिंतेने मुलीने केली आत्महत्या
कर्जबाजारी शेतकऱ्याचा चिंतेने उपवर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
औरंगाबाद : कर्जबाजारी शेतकऱ्याचा चिंतेने उपवर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
राजश्री काकासाहेब सातपुते असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दादेगावची ही धक्कादायक घटना आहे. राजश्रीचे वडील शेतकरी आहेत. २ वर्षांपूर्वी कर्ज काढून एक मुलीचे लग्न त्यांनी लावले होते.
मात्र दुसऱ्या मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. त्यात पैसे नसल्याने लग्न सुद्धा जुळत नसल्याने ते हताश झाले होते. राजश्रीच्या हे लक्षात आले. तिने आई वडील यांचे बोलणे सुद्धा ऐकले होते. त्यामुळं सोमवारी घरातील सगळे लोक शेतात गेल्यानंतर तिनं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, मराठवाड्यातील अशी ही आत्महत्या पहिली नाहीये. याआधी अनेक तरूणींनी शेतकरी वडीलांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहे. या घटनेमुळेही परिसरात एकच शोककळा पसरली आहे.