Hindoli News : मुलगी शिकली, प्रगती झाली.... हे घोषवाक्य चांगलचं लोकप्रिय आहे. या घोषवाक्याला साजेशी कृती ऊसतोड कामगारांच्या मुलींनी केली आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी येथील ऊसतोड कामगाराच्या मुलींनी आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरुन येईल अशी कामगिरी केली आहे.  साहेबराव भुरके नावाच्या ऊसतोड कामगाराची मुलगी सिव्हील इंजिनीअर झाली आहे तर दोन मुलींनी  MBBS ला प्रवेश मिळवला आहे. ( Maharashtra News in Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी येथील साहेबराव भुरके हे ऊसतोड कामगार आहेत. भुरके आणि त्यांच्या पत्नीसह ऊसतोडी निमित्ताने तब्बल सहा सहा महिने घराबाहेर असतात. मात्र, त्यांच्या मुलींनी आईबापाच्या कष्टाचे चीज केले आहे. जसं जगण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मुलींसह घडू नये असा ठाम निश्चय भुरके यांनी केला होता. अहोरात्र मेहनत करुन त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येवू नये साठी भुरके जीवतोड मेहनत घेत आहेत.


पित्याच्या कष्टाची जाण त्यांच्या मुलींना आहे. आई - वडिल घरात नसताना घर सांभाळून या मुलींनी मन लावून अभ्यास केला. मोठी मुलगी राणी साहेबराव भुरके हिने नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. आता ती सिव्हिल इंजीनियर बनली आहे. दुसरी मुलगी मोनिका आणि तिसरी मुलगी सोनम या दोघी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. भुरके आणि त्यांच्या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.