वसई : कुविख्यात गुंड दाऊद इब्राहीमची गॅंग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 


खंडणीचा प्रकार उघड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरीच्या एका व्यापाऱ्याला ६ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुंड दाऊदच्या नावाने १० जणांनी ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. या वापाऱ्याच्या वसईतील ५ एकर जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोण आहे तो व्यापारी?


अली जरार सिद्दीकी (५९) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पूर्व चांदीविहार साकीरोड येथील नाहर अमृत सक्ती आर्किड येथे राहतात. त्यांची वसईतील वालीव हद्दीत बाफणे येथे ५ एकर ३० गुंठे जमीन आहे. या जागेत १० जणांनी मिळून कंटेनर आणून जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दाऊद भाईसाठी ५ कोटी तर धमकी देणाऱ्यासाठी १ कोटी अशी एकूण ६ कोटींची खंडणी मागितली. आणि न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.