मुंबई : मुंबईतील तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखील घामांच्या धारांनी न्हावून निघत आहेत. मुंबईचं किमान तापमान 40 अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उन्हाने हैराण आहेत. तर  येत्या काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज प्रचंड म्हणजे प्रचंड उकाडा वाढला आहे. मुंबईचं तापमान आज ४० अंशांच्या पलिकडे गेलं आहे. सांताक्रुझ वेधशाळेत आज ४०.६ अंश डिग्री सेल्सियसची नोंद झाली आहे. दुपारी अडीच वाजता हे तापमान नोंदवण्यात आलं. ४० अंशांपेक्षाही जास्त तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



मुंबईच नाही  तर कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत देखील तापमान वाढलं आहे.  रायगडमध्ये उष्णतेचा पारा 40 अंशांच्या जवळ पोहोचलं आहे. तर उत्तर महाराष्ट्र , विदर्भातही उन्हाच्या झळा बसत आहेत. आता तापमानाचा पारा 40 अंशांच्या पलिकडे गेला आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाळा  कड्याकाचा असू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही.