बीड : गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सप्टेंबर २०१६ रोजी एसीबीसह विविध तपास यंत्रणांकडे या घोटाळ्याबाबत तक्रार केली होती. तर मार्च २०१७ ला पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती. मात्र एवढ्या मोठ्या घोटाळ्याची सरकारने तेव्हा दखलही घेतली नाही. 


रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड साखर कारखान्यावर कारवाई करणे दूरच सरकारने या कारखान्याकडूनच खुलासा मागवून कारखाना आणि गुट्टे कसे दोषी नाहीत याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न विधानपरिषदेत केला. रत्नाकर गुट्टे हे सरकारला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असल्यामुळेच सरकार त्यांना पाठिशी घालतेय की काय असा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना पडला आहे.