नाशिक जिल्ह्यात आणि कर्नाटकात शाळा सुरु करण्याचा निर्णय
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
नाशिक : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देश आणि राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोनाच प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरु करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
९ वी ते १२ वीचे वर्ग चार जानेवारी पासून सुरू होणार आहेत. तर पहिली ते ८ वीचं शिक्षण ऑनलाईन पध्दतीनेचं सुरू राहणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा आढावा बैठकीत ही माहिती दिली. मात्र नाशिक शहरातल्या शाळांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही.
कर्नाटक राज्यात शाळा सुरु होणार
दरम्यान, देशातील कर्नाटक (Karnataka) सरकारने शनिवारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज (PUC) आणि शाळांमध्ये दहावीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू (School Reopen) करण्याचा आणि विद्यापीठाचा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ईयत्ता ६ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा १ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय कर्नाटकच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत.