कांदा निर्यातमुल्यामध्ये घट तरीही शेतकरी चिंतेतच
कांदा निर्यातमुल्यामध्ये दीडशे डॉलरची घट करण्यात आलीय मात्र तरीही कांदा उत्पादक शेतकरी समाधानी नाहीयेत.तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातमूल्यात शून्य वरून थेट साडेआठशे रुपये डॉलरची वाढ करण्यात आली.
मुंबई : कांदा निर्यातमुल्यामध्ये दीडशे डॉलरची घट करण्यात आलीय मात्र तरीही कांदा उत्पादक शेतकरी समाधानी नाहीयेत.तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातमूल्यात शून्य वरून थेट साडेआठशे रुपये डॉलरची वाढ करण्यात आली.
निर्यातमूल्य कमी
त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाले होते, आता केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य दिडशे डॉलरने कमी करत साडेसातशे डॉलर केलयं.
तज्ज्ञांचं मत
कांद्याला अजूनही चांगले दर मिळण्यासाठी कांदा निर्यात होण गरजेचं असल्याचं शेतक-यांचं म्हणणं आहे, त्यामुळे निर्यातमूल्य कमी झाल तर कांदा निर्यात वाढेल परिणामी कांदा उत्पादकांना फायदा होऊ शकेल असा तज्ज्ञांचं म्हणणं आहे.