पुणे : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा चहा दिला नाही, म्हणून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीनं दिलीय. किसन मुंडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो कोल्हटकर यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करायचा. 


कोल्हटकर यांच्याकडे मदतनीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. एरंडवणे परिसरातील मैथिली अपार्टमेंटमध्ये कोल्हटकर राहतात. त्यांच्याकडे मदतनीस म्हणून कामाला येणारा किसन मुंडे दीपाली यांच्याकडे सारखा काहीतरी खायला मागायचा. 


रागाच्या भरात खून


घटना घडली त्या दिवशी त्यानं त्यांना चहा मागितला होता. त्याला दिपाली यांनी नकार दिल्यानंतर त्यानं रागाच्या भरात खून केला. पोलीसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्याला १६ फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.