Wardha News : वर्ध्यात हरणाच्या मटनावर ताव मारणे महागात पडले आहे.  वर्ध्यात हरणाची शिकार करून हॉटेलात पार्टी सुरु होती. वर्ध्याच्या सावंगी येथील  ठाकरे किचन मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ध्यात हरणाची शिकार करून हॉटेलात पार्टी करणाऱ्यांना ही पार्टी चांगलीच भोवली आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील ''ठाकरे किचन'' मध्ये ही हरिणाच्या मटणाची पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.


हरीणाच्या मटन पार्टी मध्ये बिल्डर झाले सामील


हरीणाच्या मटन पार्टी मध्ये शहरातील बिल्डरांचा देखील समावेश असल्याची वनविभागात चर्चा रंगली आहे. हरणाच्या शिकारीचा मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्याच्या आंजी परिसरातून हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती वनविभागाने दिली आहे. सावंगीच्या  टी पॉईंट चौकातील ''ठाकरे किचन'' यांच्या हॉटेल मध्ये हरणाच्या मटणाची पार्टी झाल्याचं तपासात पुढे आले आहे. अर्जुन सिंग राहणार आंजी (मोठी) येथील मुख्य आरोपी असल्याची वनविभागाकडून सांगण्यात आले असून हरणाच्या मटनावर ताव मारणाऱ्या आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.


कबूतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं


कबूतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. अर्णब मुखोपाध्याय असं मृत तरुणाचं नाव आहे. पुण्यातल्या लोहगाव मध्ये ही घटना घडलीय. अर्णब वगळता घरात कोणी मांसाहार करत नव्हतं. मंगळवारीही त्याला अंडी खायची होती. पण,  रात्र झाल्यामुळे पत्नीने अंडी आणण्यास विरोध केला.  त्यामुळे संतापलेल्या अर्णबने कबुतरांच्या घरट्यातून अंडी काढली आणि त्याचं आम्लेट करून खाल्लं. मात्र यामुळे कबुतरांनी गोंधळ सुरू केला. त्यांना हाकलण्यासाठी अर्णब त्यांच्यामागे चाकू घेऊन लागला. त्याच्या बायकोने त्याला थांबवलंही, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यातच त्याचा तोल जाऊन तो आठव्या मजल्यावरून खाली कोसळला.