कोल्हापूर : राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवारांनी आज कोल्हापुरात सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आपली मत स्पष्ट केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी आपलं मत मांडलं. या निकालातून भाजपचा पराभव अगदी स्पष्ट झाला असून दिल्लीकरांनी विकासाला कौल दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच यावेळी सीएए आणि एनआरसी झालं. आता समान नागरिक कायद्याचं काय असा प्रश्न विचारला असता. आता यावर बोलण्याची वेळ नाही असं म्हणतं शरद पवारांनी हा विषय पुढे ढकलला. तसेच महाविकास आघाडीवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की,'महाविकास आघाडीला एक दोन वर्षे व्यवस्थित काम करू द्या, मग बोलू या'.


महाविकासआघाडीमार्फत समाजतील सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे तो प्रयत्न सुरूच आहे. तसेच यावेळी शरद पवारांनी भीमा कोरेगाव बाबतीत म्हटलं की,' तपासाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे'. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं ते म्हणाले.



केंद्राने तपास काढून घेणं योग्य नाही आणि त्यापेक्षा राज्य सरकारने तपास केंद्राकडे देणं हे त्यापेक्षा योग्य नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले.