पुणे : मुंबईतील हिरानंदानी बिल्डरकडे २० कोटींची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


शिवसेनेचा बडा नेता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडणीच्या रक्कमेपैकी एक कोटींची रक्कम स्वीकारताना गुलाब पारखे या खंडणीखोराला पवई पोलिसांनी अटक केली. तो जुन्नर तालुक्यात शिवसेनेचा बडा नेता मानला जातो. 


आधी बिल्डर्सकडे काम


गेली २७ वर्ष गुलाब हा हिरानंदानी बिल्डर्सकडे काम करत होता. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्याने हिरानंदानीविरोधात तक्रारी करून कांम थांबवण्याचा प्रयत्न चालवला होता. 


तक्रारी मागे घेण्याससाठी खंडणी


तक्रारी मागे घेण्याससाठी त्याने खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्याआधारे खंडणीची रक्कम स्वीकारताना गुलाबला पोलिसांनी रंगेहाथ अटक करण्यात आली.