धुळे : धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी रुग्णालयात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढताय. तरी पालिकेचा आरोग्य विभाग कठोर उपाययोजना करायला तयार नाही. 


धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात पाणीपुरवठा जलवाहिनीचं काम करणा-या ठेकेदारानं जे साहित्य खुल्या जागेत ठेवलंय. त्यात मोठ्याप्रमाणात डेंग्यूचे मच्छर तयार होताय. नागरिकांनी तक्रार करूनही पालिका ठेकेदाराला विरोधात कारवाई करायला तयार आहे.