Maharastra Politics: `...मग एकनाथ शिंदेंनी गद्दारी कशी काय केली?`, फडणवीसांचा शरद पवारांना टोला!
Maharastra Politics: शरद पवार साहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा प्रश्न फडणवीसांनी पवारांना विचारला आहे.
Devendra fadanvis On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय. शरद पवारांनी केली ती मुसद्देगिरी मग शिंदेंची बेईमानी कशी? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. त्यावेळी त्यांनी देश महात्मा गांधी यांच्या विचारावर चालणार, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
नेमकं काय म्हणाले फडणवीस ?
एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, त्यानंतर ते आमच्यासह आले. तर मग त्यांनी गद्दारी केली, असं कसं म्हणता येईल. याउलट 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. त्याला तुम्ही मुसद्दे्गिरी केली असं म्हणता, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
शरद पवार साहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा प्रश्न फडणवीसांनी पवारांना विचारला आहे. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, हा देश महात्मा गांधी यांच्या विचारावर चालणार. त्यामुळे देशात गोडसेंचं उदात्तीकरण चालू देणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर दरवेळी नवा इतिहास लिहितात. शरद पवार यांना आपण कुठेही बेईमान म्हणालो नाही, असं स्पष्टीकरण देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुखपदावेळी ओबीसींचा विसर पडल्याचा आरोप देखील फडणवीसांनी केला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
मी बेईमानी कधी केली? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं? जनसंघ म्हणजे आताचा भाजपही होता. कदाचित हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. त्यांचं वाचन कमी असेल. फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अशी जहरी टीका शरद पवार यांनी होती. त्यावर आता फडणवीसांनी उत्तर दिलंय. (Latest Marathi News)