Devendra Fadanvis On Bhagat Singh Koshyari:  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी (Shudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण आणखी पेटत असल्याचं दिसत आहे. राज्यपालांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज राहणार आहेत. आजच्या काळाचे हिरो देखील छत्रपती शिवराय (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाहीये. मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे. राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा कोणताही मोठा आदर्श या देशात होऊ शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुदांशी त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी भाष्य केलंय. मी त्यांचं वक्तव्य नीट ऐकलं आहे. त्यात कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली, असं म्हटलं नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत. 


आणखी वाचा - महाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन


दरम्यान, सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श आहेत, असं फडणवीस म्हणाले. या प्रकरणावर काही विविध होण्याचं कारण नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर राज्यातील वाद आणखी पेटत चालला आहे.