Devendra Fadanvis On Uddhav Thackeray: कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेवेळी (Bharat Jodo Yatra) बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्यावर टीका केली होती. अशातच राहुल गांधी पुन्हा भाजपच्या निशाण्यावर आले. राहुल गांधींना सावरकरांचा 'स' देखील माहिती नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. त्यानंतर बोलताना फडणवीसांनी ठाकरे सेनेला देखील टीकेचे बाण सोडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहूल-आदित्य एकत्र पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. 


बाळासाहेबांचं नातं रक्ताचं नाही तर विचारांचं होत. सावकरांवर त्यांचा चांगला अभ्यास होता. बाळासाहेबांनी सावरकरांचा वारसा चालवला, असंही फडणवीस म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Devendra Fadanvis On Uddhav Thackeray) निशाणा साधला.


आणखी वाचा - Sharaddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मोर्चात आक्षेपार्ह घोषणा


दरम्यान, तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. स्वातंत्र्यावीरांना शिव्या देणाऱ्यांना जवळ करणाऱ्यांना नातं सांगण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. त्यानंतर आता येत्या काळात (Maharastra Politics) मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.