Sharaddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मोर्चात आक्षेपार्ह घोषणा

श्रद्धा हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मशाल मोर्चा

Updated: Nov 16, 2022, 07:54 PM IST
Sharaddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मोर्चात आक्षेपार्ह घोषणा title=

Sharaddha Murder Case : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला अटक करण्यात आली असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या करणा-या आफताबची आता नार्को टेस्ट (Narco Test) केली जाणार आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताब अजिबात सहकार्य करत नाहीए. उलट तो उलटसुलट उत्तरं देत चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न करतोय.

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
दरम्यान, श्रद्धा हत्या प्रकरणी आता हिंदुत्त्वावादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी  पुण्यात मशाल मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चात मुस्लिमांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. 'हर अब्दुल XXX' अशा वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या. 'मेरा अब्दुल ऐसा नही है' अशी एक जाहीरत होती, त्याला प्रतिकात्मक म्हणून अशा घोषणा दिल्या जात असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. अशी प्रकरणं पुन्हा होऊ नयेत यासाठी हा मोर्चा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हे कोणतंही जातीयवादी आंदोलन नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. 
  
या घोषणा सर्व मुस्लिम बांधवांसाठी नाहीत, काही मुस्लिम बांधव या मातीशी एकरुप झालेले आहेत, पण काही मुस्लिम भारतात राहून पाकिस्तानचे गुणगाण गातात अशा मुस्लिमांना आमचा विरोध आहे, आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. 

लव्ह जिहादचं प्रकरण?
श्रद्धाची हत्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) प्रकारातून झाल्याचा आरोप होतोय. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. आफताब आणि श्रद्धा (Shraddha Walkar) दोघेही लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) राहत होते. दोघांचेही धर्म वेगळे. श्रद्धानं घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आफताबवर विश्वास ठेवला. 

मात्र या नराधमानं तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचे 35 तुकडे केले. धर्मपरिवर्तनासाठी आफताब श्रद्धावर जबरदस्ती करत होता का? धर्मपरिवर्तनाला विरोध केला म्हणूनच आफताबने तिची हत्या केली का? असे अनेक सवाल राम कदम यांनी उपस्थित केले आहेत.