शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा सरकारला संशय; उपमुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा
शिवभोजन थाळी योजनेचा सरकारने आढावा घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
Maharashtra Politics : राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. यानंतर शिवभोजन थाळीला (Shiv bhojan Thali) ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या शिवभोजन थाळीची (Shiv bhojan Thali) योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे आता ही योजना बंद होण्याची शक्यता होती. (Devendra Fadnavis announcement regarding Shiv Bhojan Thali)
मात्र आता ठाकरे सरकारच्या काळात सुरु झालेली शिवभोजन थाळीची योजना सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला असल्याने ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरु होती. योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र आता ही योजना सुरुच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यातील गोर-गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. या योजनेत बोगस नावे, बोगस केंद्रे असल्याचा संशय आहे. यामुळेच मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या योजनेचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ही योजना सुरु ठेवण्याची विनंती केली होती. यानंतर फडणवीस यांनीही ही योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन देऊन केवळ आढावा घेण्यात आल्याचे सांगितले.
सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. याची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारसमोर आला. मात्र, त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे या योजनेला स्थगिती मिळणार अशी चर्चा सुरु होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे.