मुंबई: बालभारतीच्या गणिताच्या नवीन पुस्तकातील संख्यावाचनावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच विधानसभेत हा प्रसंग घडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचन पद्धतीत करण्यात आलेल्या बदलांवरून टीका करताना अजित पवार यांनी, आता देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडण दोन शून्य अशी हाक मारायची का?, असा उपरोधिक सवाल विचारला होता. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जशास तसे उत्तर दिले. 


बालभारतीकडून अजब बदल : मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल - नारळीकर


यासाठी फडणवीसांनी बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला. 'दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण'. उताऱ्यातील ही वाक्य मुख्यमंत्र्यांनी वाचताच सदनात एकच हशा पिकला. त्यावेळी मी कोणत्याही सदस्याला उद्देशून बोलत नसल्याचेही फडणवीसांनी सांगितले. त्याचवेळी संख्यावाचनाबद्दल काही आक्षेप असल्यास त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.