Maharashtra Assembly Election 2024 : 'मी पुन्हा येईल' हे वाक्य ऐकताच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर येत ते एकच नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यातच महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणल्यानंतर हेच देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक महिलांचे 'देवाभाऊ' झालेत. याच देवाभाऊंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला जलवा दाखवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपचं राजकीय वादळ आलंय. महायुतीनं बहुमतापेक्षा अधिकचा आकडा गाठत सत्ता आपल्याचं वाट्याला ठेवण्यात यश मिळवलंय. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलाय. मात्र, या यशाचं श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येतंय.


मोहीत कंबोज आणि फडणवीस जल्लोष


विधानसभा निवडण़ुकीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपला कधी नव्हे असं अभुतपूर्व यश मिळालंय. त्यामुळे या विजयाचं श्रेय म्हणून देवाभाऊंना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात येतंय. भाजपचे नेते मोहीत कंबोज असो की चंद्रशेखर बावनकुळे असो या सर्वांनी देवेंद्र फडणवीसांना मिठी मारत जल्लोष व्यक्त केलाय.


विधानसभेतील यशाचा देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांनी देखील आनंद व्यक्त केलाय. तर त्यांच्या आईंनी देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू असल्याचं म्हटल आहे. 


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, भाजप नेत्यांची इच्छा


टीम फडणवीस अशी ओळख असलेले भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला मिळालेल्या या यशाचा जल्लोष मुंबईतील भाजप कार्यालयात देखील करण्यात आला. यावेळी फडणवीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जलेबी एकमेकांना भरवली आणि आनंद व्यक्त केला. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत महाराष्ट्राच्या या देवाभाऊंना विधानसभेत आपला करिष्मा दाखवला खरा मात्र, हाच करिष्मा त्यांच्या राजकीय प्रवासाला कसं वळण देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.