MoU between Google and Government of Maharashtra : आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI च्या मदतीने राज्याचाविकास करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लान आहे. राज्य सरकारने  गुगल सोबत महत्वाचा करार केला आहे. राज्य सरकार विविध क्षेत्रात AI ची मदत घेणार आहे. याचा वापर जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी केला जाणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार सात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीनं एप्लिकेशन विकसीत करणार आहे. लोकांचं जीवन सुकर करण्याचा हा प्रयत्न असेल. या अनुषंगाने  राज्य सरकारने गुगल सोबत महत्वाचा करार केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


नागपूरमधे AI एक्सलन्स सेंटर 


हा ऐतिहासिक दिवस आहे. राज्यातील लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी गुगलसोबत महत्वाचा करार होत अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे.नागपूरमधे AI एक्सलन्स सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा देखील   देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संपूर्ण जग तंत्रज्ञानावर सुरु आहे. अशावेळी सरकारचे प्रशासन यापासून वेगळे राहू शकत नाही. कारण या तंत्रज्ञानामधे लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे.  कृषी क्षेत्रातील अडचणी AI च्या माध्यमातून दुर होऊ शकतात.  महाराष्ट्र हे स्टार्ट अपचे कॅपिटल आहे. आरोग्य क्षेत्रात देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.   सरकारसोबत काम केल्याने गुगल सारख्या कंपनीचा अनुभव वाढणार आहे. पंतप्रधान नरेंदर मोदींनी देशातील लोकांसोबत योजना पोहोचवण्याची यंत्रणा विकसित केली.  आधी योजना होत्या पण त्या लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या.   हा करार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल असा विश्वास  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


देशातील पहिलं 'एआय' विद्यापीठ 


देशातील पहिलं 'एआय' विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु करण्यात आले आहे. Universal AI University असे या विद्यापीठाचे नाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातलं पहिलंच विद्यापीठ ठरलंय. या विद्यापीठासाठी कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार करण्यात आलाय. या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात.