ठाकरेंच्या `ऑडिओ`ला फडणवीसांचं `व्हिडीओ`ने उत्तर, `बोलतो ते करतो, काहींना जनाची नाही आणि...`
ठाकरे-फडणवीसांमध्ये वीजबिलावरून जुंपली, ठाकरेंच्या ऑडिओला क्लिपनंतर फडणवीसांनी `लावला व्हिडीओ`
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि बंडखोर आमदारांवर खरमरीत टीका केली. ठाकरे यांनी भर सभेमध्ये वीजबीलाच्या माफीवरून फडणवीसांची Audio क्लिप ऐकवत निशाणा साधला होता. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी 15 सेकंदाचा व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra fadnavis reply video to uddhav thackeray on light bill latest marathi news)
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे यांच्या दोन प्रतिक्रिया व्हिडीओमध्ये ट्विट केल्या आहेत. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय, असं म्हणत फडणवीसांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच पत्रही ट्विट केलं आहे. त्यामध्ये जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रूपये स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजबील माफ केली आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये रोज सावकारी पद्धतीने वीजबील वसूल केली जात आहेत, असं फडणवीस ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत. यावर, काय बोलत होते त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे की मध्य प्रदेशने शेतकऱ्यांचे वीज बील भरले आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणा आम्ही फटाके फोडत आहोत ज्याचा आवाज त्या ठिकाणी जाईल.