पुणे : 'माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही', असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोविड सेंटरच्या उद्घानप्रसंगी बोलत होते. बाणेर येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनात फडणवीस बोलत होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बाणेर येथील कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र उपस्थित होते. यावेळी फडणवीस भाषण करत असताना माईक मधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी, 'आवाज, आवाज' असा उल्लेख केला.  त्यावेळी फडणवीसांनी मास्क खाली करत,'माझा आवाज कोणी दाबू शकत नाही', असं विनोदाने म्हणाले. तेव्हा त्यांच्या शेजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हसू आवरलं नाही.  



यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात भव्य असे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या माध्यमांतून उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. सध्याची वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असून अधिकाधिक तपासण्या झाल्या पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.


परीक्षा घेण्यावर काय म्हणाले फडणवीस?


देशभरातल्या कुलगुरूंचे मत परीक्षा घ्यावी हेच होते. केवळ युवा सेनेच्या आग्रहाखातर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. आता न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत.