तुम्ही दिल्लीत गेलात पण सोनियाजींसमोर नतमस्तक होण्यासाठी, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक अशा शब्दात टीका केली आहे
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर फडणवीस दिल्लीमध्ये गेले होते. यावरून ठाकरे गटातील नेत्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. याचाच धागा पकडत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही, कोण झुकवतंय? कोण असा प्रयत्न करत आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि दिल्ली ही संविधानाने ठरवून दिलेली राजकीय राजधानी आहे. राजकीय राजधानी दिल्ली असेल तर दिल्लीला जावच लागणार. त्याशिवाय आपल्या राज्याचे प्रकल्प पूर्ण कसे होणार?, तुम्ही गेलात तेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी गेला नाहीत, तर सोनियाजींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेलात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
माझा कोणीतरी उल्लेख करताना मला बच्चन म्हणालं, पण माझं शरीर अमझद खानसारखं आहे. त्यामुळे मी विचारू शकतो की कितने आदमी थे... 65 मे से 50 निकल गए और सबकुछ बदल गया, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज मुंबई भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, जहाँ हम खडे होते है, लाइन वही से शुरू होती है. देवेंद्र जी तुम्ही जिथे उभे रहाल तिथूनच लाइन सुरू होणार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही पट बदलला, कोणाच्याही मनात नव्हतं अशा स्वरूपाचं राजकीय चित्र महाराष्ट्र पाहत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.