बीड : बीड येथील डीसीसी बँक निवडणुक रिंगणातून मतदानाच्या काही तासांपूर्वीच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी माघार घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत मुंडेंनी ही घोषणा केली आहे.


मुंडे म्हणाल्या, डीसीसी बँक निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेचा वापर केला. त्यामुळे 9 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर भाजप बहिष्कार घालत आहे. 


आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणुकीकडे पाहत होतो. पण निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होतोय. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय होतोय असं जाहीर निवडणुक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला.