धनंजय मुंडे माझ्यासमोर आव्हान निर्माण करूच शकणार नाहीत- पंकजा मुंडे
बीड येथील राष्ट्रवादीची स्थानिक फळी कमकुवत आणि निकृष्ट झाली आहे.
नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात धनंजय मुंडे माझ्यासमोर आव्हान निर्माण करूच शकत नाही, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीडमध्ये पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी परळीतून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, शरद पवार यांना बीडमध्ये येऊन उमेदवार घोषित करावे लागले. याचा अर्थ बीड येथील राष्ट्रवादीची स्थानिक फळी कमकुवत आणि निकृष्ट झाली आहे. त्यामुळे परळी मतदारसंघात धनंजय मुंडे माझ्यासाठी आव्हान ठरण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मीच त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यामुळे यंदा परळीत भावाबहिणीतील ही लढाई चुरशीची होणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.
फडणवीसांना स्वप्नातही मीच दिसतो; शरद पवारांचा खोचक टोला
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादीही १२५ जागा लढणार आहे. तर उरलेल्या ३८ जागा या घटकपक्षांना देण्यात येणार आहेत.
आपल्या वाट्याला आलेल्या १२५ जागांपैकी पाच जागांवरील उमेदवारांची नावे बुधवारी शरद पवारांनी जाहीर केली. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाश सोळंके आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
'चार काळे फुगे उडवायचे, कोंबड्या हवेत भिरकावयाच्या, ही काय आंदोलनं झाली'