विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळताय, JEE-NEET परीक्षेवरून धनंजय मुंडेंची टीका
काय म्हणाले धनंजय मुंडे
मुंबई : JEE-NEET च्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुंख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. यामध्ये जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट केलं आहे.
कोरोना या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या JEE/NEET परीक्षा घेणं म्हणजे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. केंद्र सरकारने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय आता रद्द करावा, असा माझा आग्रह आहे. अलं ट्विट त्यांनी केलं आहे.
जेईई (मुख्य) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत. आता नीट अंडर ग्रॅज्युएट-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात एनटीएने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना कोरोना काळात प्राधान्याने त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रांचा पर्याय निवडावा लागला. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या आधारे परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. परीक्षांची अधिकृत माहिती देताना एनटीएने सांगतिलं की, जेईई आणि नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.
जेईई परीक्षा केंद्राची संख्या 570हून अधिक वाढवून ती 600 करण्यात आली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी क्रेंद्रांची संख्या 2546 वरुन 3843 करण्यात आली आहे.