विष्णू बुरगे, झी मीडीया, बीड : बीडच्या(Beed) राजकारण एक धक्कादायक घडामोड पहायला आहे. परळी तालुक्यात पंकजा मुंडेंना(Pankaja Munde) जबरदस्त धक्का बसला आहे. बंधू धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनीच ताईंना धक्का दिलाय. सोसायटी निवडणुकीनंतर पांगरी गोपीनाथ गड(Goponath Gad) ग्रामपंचायतही(Garampanchayat) राष्ट्रवादीच्या(NCP) ताब्यात गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळी मतदारसंघांमध्ये पाच ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. यातल्या दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे पांगरी गोपीनाथ गड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची बिनविरोध निवड झाली. 
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात. सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली. 


बिनविरोध निघालेल्या पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पांगरी गोपीनाथ गड आणि तळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.